। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नुकत्याच झालेल्या देगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन शुक्रवारी (दि.18) सायकांळी 4 वाजता आ.जयंत पाटील यांच्या हस्ते एस.एस.हायस्कुल मोर्बा याठिकाणी करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची जोरदार तयारी तालुका शेकापच्या वतीने करण्यात आल्याची माहिती तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी दिली. कार्यक्रमास माजी आ. धैर्यशील पाटील, पंडित पाटील, जिल्हा शेकाप चिटणीस अॅड.आस्वाद पाटील, आरडीसीसी बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश खैरे, नानासाहेब सावंत, आरडीसीसी बँकेचे संचालक अस्लमभाई राऊत, जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, माजी राजिप सदस्या आरती मोरे, सुशील कदम, राजिपचे माजी सभापती अशोक गायकवाड आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास तालुक्यातील शेकापच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी केले आहे.