एसटी कर्मचार्‍यांना शेकापचा पाठिंबा

। अलिबाग । वार्ताहर ।
एसटी कर्मचारी संघटनांनी सुरू केलेल्या संपाला शेतकरी कामगार पक्षाने जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. याबाबत शेकापच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे, की शेकापचे सर्व कार्यकर्ते हे एसटी मंडळाचे जे सेवक, कर्मचारी, बंधू-भगिनी यांना पूर्ण शक्तिनिशी पाठिंबा देण्यासाठी अलिबाग एसटी स्टॅण्डवर गेले होते. यावेळी तालुका चिटणीस अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग सहचिटणीस अनिल गोमा पाटील, पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, उपसभापती संतोष पाटील, पुरोगामी युवक संघटना तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे, ॠषीकेश नाईक (सारळ ग्रामपंचायत), ज्येष्ठ कार्यकर्ते जनार्दन शेळके, युवा कार्यकर्ते रितेश चौलकर, रोहित पाटील, अनिश मिठागरी उपस्थित होते.
शेतकरी कामगार पक्ष हा कष्टकर्‍यांचा पक्ष आहे आणि सर्व एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्या या 100 टक्के रास्त आहेत. गेली 25 ते 30 वर्षे नोकरी करत असूनसुद्धा पगार वाढत नाही, ही शोकांतिका आहे. कारण, जे एसटी कर्मचारी आहेत, त्यांनी कोरोनाच्या या भीषण काळात डॉक्टर, नर्स आदींना योग्य वेळी, योग्य ठिकाणी पोहोचवण्याचे काम केलेले आहे. अतिशय युद्धजन्य परिस्थिती असतानासुद्धा कोणताच पुढचा-मागचा विचार न करता ते कार्यरत होते. आणि, म्हणूनच या कर्मचार्‍यांना पाठिंबा देण्यासाठी शेकापचे कार्यकर्ते अलिबाग स्टॅण्डवर गेले होते. तसेच यावेळी बोलत असताना आ. जयंत पाटील यांनी एसटी कर्मचार्‍यांना संपूर्ण जिल्हा, तालुका आणि शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा शेकापच्या कार्यकर्त्यांना देण्यास सांगितला असल्याचे सहचिटणीस अनिल गोमा पाटील यांनी सांगितले.

एसटी कर्मचार्‍यांच्या संपाला शेकापचा पाठींबा
शेतकरी कामगार पक्ष हा नेहमीच कष्टकरी, श्रमजीवी, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नशील असतो. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार माजी आ.पंडीत पाटील व जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा तालुक्याच्या वतीने रोहा आगारातील संपकरी एसटी कर्मचार्‍यांची भेट घेऊन त्यांच्या संपाला शेतकरी कामगार पक्षाचा पाठींबा असल्याचे पत्र देण्यात आले.

शेकाप कर्मचार्‍यांच्या पाठीशी
मुरुड आगारात सध्या एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू असून, या संपला शेतकरी कामगार पक्षाने जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. एसटी कर्मचार्‍यांची मागणी रास्त असून, कमी पगारात येथील कर्मचारी काम करीत आहेत. त्यांच्या मागणीला शेतकरी कामगार पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्याची घोषणा तालुका चिटणीस मनोज भगत यांनी केली आहे. पक्षाच्या आदेशाप्रमाणे त्यांनी हा पाठिंबा जाहीर केला.

Exit mobile version