रोहा तालुक्यात शेकापची घोडदौड सुरूच

। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यात 18 डिसेंबर रोजी पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम वेळेनंतर शेतकरी कामगार पक्ष विकास आघाडीने खैरखुर्द ग्रामपंचायतीमध्ये 9 पैकी 4 जागा बिनविरोध निवडून आणत आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे.

तळवली तर्फे अष्टमी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. खैरखुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत शेकाप प्रणित विकास आघाडीच्या शैला अंकुश वाघमारे, भगवान वेटू यादव,नरेश जानू देवळे सेना (ठाकरे गट), रिना तुषार कोंडे (अपक्ष) हे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, माजी आ.पंडीत पाटील, जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

Exit mobile version