| रोहा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यात खैरखुर्द, पहूर, दापोली, तळवली तर्फे अष्टमी, पुई या पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. रोहा तहसीलदार कार्यालयात सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली. या छाननी मध्ये खैरखुर्द ग्रामपंचायती मधील एक अर्ज अवैध झाल्याने शेकापच्या शैला अंकुश वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. वाघमारे यांची बिनविरोध निवड झाल्याने शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, तालुका चिटणीस राजेश सानप, माजी आमदार पंडीत पाटील, जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी अभिनंदन केले आहे.