| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यात 26 ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासाठी 110 अर्ज आले होते. त्यातील अर्ज बाद झाले आहेत. 226 सदस्य पदांसाठी एकूण 580 उमेदवारी अर्ज आले होते. त्यातील अर्ज बाद झाले आहेत. सोमवारी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली.यावेळी तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये मोठयाप्रमाणात उमेदवार व समर्थकांची गर्दी पहायला मिळाली. तहसील कार्यालयाच्या सरदार वाघोजी तुपे सभागृहामध्ये वेगवेगळया 26 ग्रामपंचायतींचे टेबल मांडण्यात आले होते. यामध्ये उमेदवार अथवा उमेदवारांचे समर्थकांना घेण्यात येत होते.
दोन विभागात 26 ग्रामपंचायतींचे विभाजन करण्यात आले होते. पहिल्या 13 ग्रामपंचायतींची साडेअकरा ते साडेबाराच्या दरम्यान छाननी करण्यात आली. यामध्ये सोनखार ग्रामपंचायतीमध्ये जातप्रमाणपत्र नसल्याने एक उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले. तर मुंढाणी ग्रामपंचायतीमध्ये देखील अपुर्या कागदपत्रांमुळे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. नंतरच्या तेरा ग्रामपंचायती काराव, डोलवी समावेश होतो. सायंकाळी पाच वाजले तरी काराव ग्रामपंचायतीचा छाननीचा कार्यक्रम सुरु होता. काराव ग्रामपंचायतीमध्ये एकूण 13 सदस्य असून त्यासाठी 45 अर्ज आले होते. परंतु, आर्थिकदृष्टया ही ग्रामपंचायत सबल असल्याने व निवडणूक अधिकारी नवखा असल्याने मोठयाप्रमाणात गोंधळ पहायला मिळाला.
शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पेण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देवेंद्र पोल यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तर तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, नायब तहसीलदार नितीन परदेशी, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर हे देखील सभागृहामध्ये प्रत्येक बाबीवर बारकाईने लक्ष ठेवून होते.