3,212 जणांची निवड
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद युवक, युवतींकडून मिळाला. संध्याकाळपर्यंत या मेळाव्यात युवक युवतींचा मोठ्या संख्येने सहभाग निर्माण झाला होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 6,400 युवक व युवतींनी नोंदणी केली होती.
त्यापैकी 3212 युवक, युवतींना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये थेट नोकरीची संधी मिळाली आहे. त्यामुळे प्रत्येकाचा चेहरा फुलून गेला होता. युवक युवतींसोबत आलेल्या पालकांनीदेखील अशा प्रकारे मेळावे भरून युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्याने समाधान व्यक्त केले.