मान्यवर पाहुण्यांचे सभामंडपात आगमन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
वडखळ येथे शेतकरी कामगार पक्षाच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनाला थाटात प्रारंभ झाला असून, ‘लाल बावटे की जय’, ‘शेकापचा विजय असो’ अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला आहे. या मेळाव्यासाठी आम आदमी पक्षाचे नेते गोपाळ राय, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील, माजी आ. धैर्यशील पाटील, माजी आ. पंडित पाटील, आ. बाळाराम पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील, शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित आहेत. तसेच रायगडसह संपूर्ण राज्यभरातून 30 हजारांहून अधिक कार्यकर्ते मेळाव्यात सहभागी झाले आहेत. अलिबाग ते पनवेल मार्गावर दुतर्फा लाल बावटे लावण्यात आल्याने सारा परिसर शेकापमय होऊन गेलेला आहे.

दरम्यान, कार्यक्रमस्थळी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब देशमुख, आपचे नेते गोपाळ राय, माजी खा. राजू शेट्टी, अॅड. राजू कोरडे यांचे आगमन झाले असून, या सर्व मान्यवरांचे आ. जयंत पाटील, आ. बाळाराम पाटील आदींनी स्वागत केले.