• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

वाघ्रणमध्ये शेकापचा लाल बावटा फडकणार

Santosh Raul by Santosh Raul
November 2, 2023
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
वाघ्रणमध्ये शेकापचा लाल बावटा फडकणार
0
SHARES
87
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| दिपक पाटील | वाघ्रण |

अलिबाग तालुक्यातील वाघ्रण ग्रामपंचायत हद्दीत शेतकरी कामागार पक्षाच्या माध्यमातून अनेक विकासकामे करण्यात आली आहेत. याच विकासकामांची शिदोरी घेऊन पुन्हा एकदा शेकापचे उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. वाघ्रणमध्ये तिरंगी लढत होणार असून थेट सरपंचपदासाठी शेकापकडून राजेंद्र हरिश्चंद्र पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याशी कृषीवल टीमने संवाद साधला असता तरुणांसाठी रोजगार, महिलांसाठी विविध उपक्रम, रस्ते, पाणी आदी मुलभूत सुविधांवर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या 5 नोव्हेंबर रोजी मतदान होत असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत वाघ्रणच्या निवडणुकीसाठी शेकापचे उमेदवार मोठ्या ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शेकापच्या माध्यमातून वाघ्रण आणि खारपेढांबे येथे केलेला विकास त्याचबरोबर मागील पाच वर्षात शेकापचे सरपंच आणि सदस्यांनी ग्रामपंचायत माध्यमातून केलेली कामे या जोरावर पुन्हा एकदा ही निवडणूक शेकापच जिंकणार, असा विश्वास वाघ्रण आणि खारपेढांबे गावातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. सन 2023 ते 2028 या पंचवार्षिक मुदतीसाठी ही निवडणूक होत असून निवडणूक रिंगणात शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार राजेंद्र हरिश्चंद्र पाटील हे थेट सरपंचपदाचे उमेदवार असून प्रभाग क्रमांक एकमध्ये सदस्यपदासाठी प्रितेश पाटील, प्रमिला उमेश पाटील हे आहेत. तर प्रभाग क्रमांक 2 मध्ये समीर हेमंत पाटील, वत्सला केसरीनाथ पाटील तसेच प्रभाग क्रमांक 3 मध्ये विपूल संजय पाटील व वंदना रमेश पाटील निवडणूक लढविणार आहेत. यावेळी सरपंच पदासाठी तिरंगी लढत आहे तर सदस्य पदासाठी प्रभाग क्रमांक एक व तीनमध्ये नव्याने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रिंगणात आहेत. तर प्रभाग 2 मध्ये एकास एक अशी लढत आहे.

वाघ्रण-खारपेढांबे अशी दोन गावे क्षेत्र असलेल्या या ग्रुप ग्रामपंचायत वाघ्रण निवडणुकीसाठी एकूण 1075 मतदार आहेत. या ग्रामपंचायतीवर सर्वाधिक काळ शेकापने सत्ता राखली असून सर्वांगीण विकास केला आहे. अनेक समस्या मार्गी लावल्या असून विकासावर भर दिला आहे. यामध्ये शेकापचे नेते आ. जयंत पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आ. पंडित पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्या भावना पाटील, ॲड. आस्वाद पाटील, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. आ. जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने घराघरात पिण्याचे पाणी पोहोचले आहे. या ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या दोन गावांना मुबलक पाणी देण्याचे काम शेकापने विविध योजनेच्या माध्यमातून केल्याने त्याचा प्रतिसाद निश्चितच शेकापच्या सर्व उमेदवारांना या निवडणुकीत होईल, असे अनेकांचे म्हणणे आहे. पाणी प्रश्न सोडून आजपर्यंत वाघ्रणच्या विकासात शेकापचा मोठा वाटा आहे. वाघ्रण ग्रामपंचायत हद्दीचा सर्वांगीण विकास शेकापने केला असून त्या अपेक्षेने सरपंच आणि सर्व सदस्य उमेदवार व कार्यकर्ते मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी सर्वच उमेदवार धावपळ करताना दिसत आहेत. रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य यावर भर देत केलेल्या विकासकामांचा विचार करता शेकापची घोडदौड यशस्वी होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. सार्वजनिक आणि सांस्कृतिक कार्यासाठी शेकापच्या नेते मंडळींनी लावलेला कायमचा हातभार विजयासाठी हमखास सहकार्य करेल असे माजी सरपंच व सदस्यांचे मत आहे.



वाघ्रणमध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये 472 मतदार असून प्रभाग 2 मध्ये 210 मतदार तर प्रभाग 3 मध्ये 393 मतदार आहेत. गावात प्रचार सुरु झाला असून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. उमेदवार पुरूष, महिला युवा मतदारांच्या भेटी आणि प्रचार करीत असून शेकापचा विजय होईल, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.

विकासकामे सन 2018 ते 2023
01) वाघ्रण हनुमान आळी सार्वजनिक शौचालयाकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण करणे.
02) प्राथमिक शाळा मागील बाजूस जाळी बसविणे.
03) खारपेढांबे अंगणवाडीत रंगरंगोटी करणे सन 2019-20
04) वाघ्रण हद्दीत रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे.
05) संजय श्रीधर पाटील यांच्या घरासमोरील सार्व. नळ कनेक्शन ते जयवंत नारायण पाटील रस्ता करणे.
06) कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना.
07) अंगणवाड्यांना साहित्य पुरविणे. (वाघ्रण, खारपेढांबे)
08) ग्रामपंचायत कार्यालयास फर्निचर पुरविणे.
09) खारपेढांबे अंगणवाडीस लादी बसविणे.
10) ग्रामपंचायत कार्यालय दुरूस्त करणे.
11) संजय श्रीधर पाटील ते अस्मिता अनिलकुमार पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे.
12) ग्रुप ग्रामपंचायत वाघ्रण हद्दीत नवीन पाईपलाईन टाकणे.
13) ग्रुप ग्रामपंचायत वाघ्रण हद्दीतील सार्वजनिक शौचालय दुरूस्ती करणे.
14) वाघ्रण अंगणवाडीसाठी लाईट फिटिंग करणे.
15) वाघ्रण ग्रा.पं. हद्दीमध्ये वैयक्तिक नळ कनेक्शनसाठी नवीन पाईपलाईन टाकणे.
16) खारपेढांबे अंगणवाडीसाठी लाईट फिटिंग करणे.
17) उपकेंद्र तार कंपाऊंड करणे.
18) वाघ्रण अंगणवाडी इमारत दुरूस्त करणे.
19) विविध सामाजिक कार्यक्रमांवर भर देण्यात आला असून शैक्षणिक क्षेत्रातही कामे करण्यात आली.

Related

Tags: alibaggrampanchayatgrampanchayat electiongrampanchayat election 2023indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadskpskp alibagskp newssocialsocial mediasocial media newssocial news
Previous Post

नागांव परिसरात बिबट्याची दहशत कायम

Next Post

मराठा आरक्षण मिळेपर्यंत आम्ही कोणत्या पक्षाचे नाही

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

भरधाव टेम्पो स्कूल बसला धडक; दोन विद्यार्थी जखमी

February 12, 2026
गांधारी पुलाचा पिलर पुन्हा तोडणार
sliderhome

गांधारी पुलाचा पिलर पुन्हा तोडणार

February 12, 2026
अलिबाग

‌‘व्हॅलेंटाइन डे’ला विवाहबद्ध होण्याची संधी हुकणार!

February 12, 2026
sliderhome

लोकसहभागातून घडणार आरोग्यदायी महाराष्ट्र

February 12, 2026
रायगडमध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
sliderhome

रायगडमध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

February 12, 2026
नवी मुंबई पोलिसांची आता तिसरी नजर
sliderhome

नवी मुंबई पोलिसांची आता तिसरी नजर

February 12, 2026
Next Post
मराठा आरक्षण मिळेपर्यंत आम्ही कोणत्या पक्षाचे नाही

मराठा आरक्षण मिळेपर्यंत आम्ही कोणत्या पक्षाचे नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?