आ. श्यामसुंदर शिंदेंकडून उमेदवारांचा सत्कार
| लोहा | प्रतिनिधी |
काटकळंबा, ता. कंधार येथील परिवर्तन विकास पॅनलचे सेवा सहकारी सोसायटीवर शेतकरी कामगार पक्षाने दणदणीत विजय प्राप्त केला आहे. लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या समर्थकांनी हा विजय खेचून आणत विरोधकांना चारी मुंड्या चीत केले. सर्व विजयी उमेदवारांचे आ. श्यामसुंदर शिंदे यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, आ. शिंदे यांच्या निवास्स्थानी विजयी उमेदवारांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा आशाताई शिंदे व शेकापचे मराठवाडा विभागीय सहचिटणीस विक्रांत शिंदे उपस्थित होते. यावेळी विजयी उमेदवार व गावकऱ्यांच्या वतीने आ. श्यामसुंदर शिंदे, आशाताई शिंदे व युवा नेते विक्रांत शिंदे यांचा सत्कार करून आभार मानले.
याप्रसंगी नवनिर्वाचित चेअरमन नवनिर्वाचित संचालक संभाजी रामराव, पा. पानपट्टे, पवार दत्ता माधवराव, विठ्ठल माधवराव लोहकरे, विठ्ठल दशरथ बस्वदे, परसराम शंकर बस्वदे, बालाजी आनंदा पानपट्टे, नागोराव गणपती एकाळे, सय्यद यासीनसाब गुडुसाब, लक्ष्मीबाई आनंद यलगडवाड, शोभाबाई रावसाहेब मोरे, शिवाजी परबता चोंडे, दत्ता आनंदा चावरे, सुनिल नरसिंगराव सुपलकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माधवराव पानपट्टे, सलाम साहेब, माजी सरपंच राष्ट्रपाल चावरे, छणु पाटील पानपट्टे, शिवाजी हाणमंतराव पा पानपट्टे, तंटामुक्ती अध्यक्ष माधवराव कांबळे, सतीश पा. पानपट्टे, दिगंबर कांबळे, गजू आप्पा चोंडे, संजय गोविदराव पा पानपट्टे, बाबुसाहेब सय्यद, संजय बालाजी पा पानपट्टे, भीमाशंकर माधवराव हांम्पले, उत्तम मोरे, युसुप सय्यद, जगदीश पानपट्टे, वैभव चावरे, विशाल भाऊ पानपट्टे, राम दादा चावरे आदी मान्यवर उपस्थित होते.