शेकापचे कार्य दीपस्तंभासारखे

वळवलीत गरजूंना मोफत चष्म्यांचे वाटप; चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन

| अलिबाग | प्रतिनिधी |

कोरोनाच्या संकटकाळात शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी सर्वसामान्यांना आधार दिला. समाजाची गरज ओळखून जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा केला. निःस्वार्थ भावनेने सुरु असलेली आरोग्यसेवा प्रेरणादायी असून, दृष्टीदोष असलेल्या ग्रामीण भागातील गरजूंसाठी दीपस्तंभ ठरली आहे, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.


श्री द्वारकाधीश ग्रामस्थ मंडळ, वळवली आणि लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट नेत्र रुग्णालय पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने द्वारकाधीश उत्सवानिमित्त नेत्र चिकित्सा शिबीर वळवली येथे सोमवारी (दि.27) पार पडले. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन चित्रलेखा पाटील यांचे हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित रुग्णांशी संवाद साधला. यावेळी शेकाप कार्यकर्ते मोहन धुमाळ, महेश झावरे, अवधूत पाटील, निनाद वारगे यांच्यासह आयोजक भालचंद्र वसंत पाटील, जीवन अनंत पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, या शिबिरात दोनशेहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी दृष्टीदोष असणार्‍या 141 रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित रुग्णांना मोफत चष्मे मिळाल्याने त्यांनी आयोजक व शेतकरी कामगार पक्षाला धन्यवाद दिले.

Exit mobile version