पोलिसांच्या बळाचा वापर करीत जमीन बळकावण्याचा डाव
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील शहापूर येथील जमीन पोहच रस्त्यासाठी बळकावण्याचा घाट सरकारने घातला आहे. पोलीस बळाचा वापर करीत जमीन मोजणीचा प्रयत्न एमआयडीसी अधिकारी व महसूल अधिकार्यांनी केला. मात्र शेतकर्यांनी आक्रमक पावित्रा घेतल्याने ही मोजणी तुर्तास थांबविण्यात आली आहे. परंतु परिसरात तणावाचे वातावरण अजूनही कायम आहे.
यावेळी शेकाप नेते माजी आ. पंडित पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी शेतकर्यांच्या बाजूने ठाम उभे राहून मोजणीला आलेल्या अधिकार्यांना धारेवर धरत शेतातून हुुसकावून लावले.