कडक उन्हाळ्यात झाडांची सावली गायब
| महाड | प्रतिनिधी |
एकीकडे हजारो कोटी रुपये खर्च करुन दरवर्षी लाखो नव्या वृक्षांची लागवड करण्याची मोहीम शासनाने हाती घेतलेली असताना, दुसरीकडे विकासाच्या नावाखाली हजारो जुन्या वृक्षांची विकासाच्या नावाखाली कत्तल करुन या मोहिमेला हरताळ फासला जात आहे. महाड तालुक्यात गेली काही वर्षात विविध रस्त्यांची कामे सुरु आहेत. दरम्यान, रस्त्यांच्या रुंदीकरणात अडथळा ठरणार्या हजारो वृक्षांची कत्तल करण्यात आली असून, मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात इंदापूर ते वडपालेदरम्यान 1580 वृक्ष, तर वडपाले ते कशेडीदरम्यान 2942 वृक्ष तोडण्यात आले आहेत. महाड रायगड मार्गावर असलेले 911 वृक्ष तोडेल जाणार आहेत.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण, महाड रायगड मार्गाचे रुंदीकरण, महाड- महाप्रळ-पंढरपूरचे रुंदीकरण, महाड-आंबडवे या रस्त्यांचा तर तालुक्यातील इतर ग्रामीण भागातील रस्त्यांचादेखील समावेश आहे. त्याशिवाय विविध विकासात्मक कामेदेखील सुरु असल्याने यामध्येदेखील सातत्याने वृक्षतोड होत आहे. कडक उन्हाळ्यात वाहनचालक रस्त्याकडेला उभे राहण्यास एखाद्या झाडाची सावली शोधत क्षणभर विश्रांती घेतो. मात्र, याच झाडांची सावली आता दुरापास्त झाली आहे. रस्त्यांचा विकास झाला, मात्र अनेक वर्षे याच वाहनचालकांना, प्रवाशांना सावली देणारी महाकाय वृक्ष तोडण्यात आली. त्यांची कत्तल करण्यात आली. रस्ते विकासाच्या नव्या धोरणात नवीन वृक्षलागवड असली तरी अद्याप याला प्रारंभ झालेला दिसत नसल्याने झाडांची सावली मिळण्यास किती वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रस्ते विकासाबरोबर औद्योगिक क्षेत्रात देखील अशीच अवस्था निर्माण झाली आहे. नवीन कंपन्यांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. कंपन्या मात्र पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून कंपन्या उभ्या करत आहेत. महाड तालुक्यात गेली काही वर्षात विविध रस्त्यांची कामे सुरु आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण, महाड रायगड मार्गाचे रुंदीकरण, महाड महाप्रळ पंढरपूरचे रुंदीकरण, महाड आंबडवे या रस्त्यांचा तर तालुक्यातील इतर ग्रामीण भागातील रस्त्यांचा देखील समावेश आहे. त्याशिवाय विविध विकासात्मक कामे देखील सुरु असल्याने यामध्ये देखील सातत्याने वृक्ष तोड होत आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात इंदापूर ते वडपालेदरम्यान 1580 वृक्ष, तर वडपाले ते कशेडीदरम्यान 2942 वृक्ष तोडण्यात आले आहेत. महाड रायगड मार्गावर असलेले 911 वृक्ष तोडेल जाणार आहेत. हीच स्थिती म्हाप्रळ-पंढरपूर मार्गावरदेखील आहे. याठिकाणी 138 वृक्ष तोडले जाणार असल्याचे महाड वन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
महामार्ग ज्या पद्धतीने विकसित होत आहेत, त्या पद्धतीने वृक्षलागवड मात्र अद्याप सुरु झालेली नाही. तोडलेल्या वृक्षांच्या दहा पटीत वृक्षलागवड होणे अपेक्षित आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला सावली देणारे वृक्ष लावले तरी शेजारी असलेल्या सरंक्षक कठड्यांमुळे वाहन थांबवून सावलीचा आधार घेणे शक्य होणार नाही. यामुळे ऐन कडाक्याच्या उन्हात सावली मिळणे कठीण झाले आहे.
नवनवीन प्रकल्प राबवत असताना पर्यावरण संवर्धनाचा विचार केला जात नाही, यामुळे वन्यजीव आणि वनसंपदा नष्ट होत आहे. याबाबत शासनाने वेळीच विचार करणे गरजेचे आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वनसंपदा ही या भागातील सौंदर्याला पोषक होती.
निलेश पवार, अध्यक्ष, महाड तालुका पत्रकार संघ