। न्युयॉर्क । वृत्तसंस्था ।
यंदाच्या टी-20 विश्वचषकात एकूण 20 संघ खेळत आहेत. याआधी या स्पर्धेच्या कोणत्याही आवृत्तीत 16 पेक्षा जास्त संघ खेळले नव्हते. यावेळी तीन नवीन संघांनी पदार्पण केले आहे, ज्यामध्ये आफ्रिकेतील युगांडा या देशाच्या संघाचाही समावेश आहे. युगांडाच्या एका खेळाडूला टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. जुमा मियागी असे या खेळाडूचे नाव असून तो वेगवान गोलंदाज आहे. मियागी अवघ्या 21 वर्षांचा आहे. मियागी याला राहण्यासाठी घर नव्हते. तो झोपडपट्टीत राहत होता. येथून निघून युगांडा क्रिकेट संघात सामील होणे त्याच्यासाठी अजिबात सोपे नव्हते. युगांडाची राजधानी कंपालामध्ये सुमारे 60 टक्के लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. जुमा मियागी हा देखील या झोपडपट्टीतील एक रहिवासी आहे.