वाशी हवेली गावाला स्मार्ट ग्रामपंचायत समितीची भेट

। तळा । वार्ताहर ।

वाशी हवेली ग्रामपंचायतीला तालुका स्तरीय स्मार्ट ग्रामपंचायत समितीने भेट दिली. वाशी हवेली येथे तालुका स्तरीय स्मार्ट ग्रामपंचायतीसाठी पेण येथील गटविकास अधिकारी स्मार्ट ग्रामसमितीच्या अध्यक्षा सविता कांबळे, सहाय्यक लेखाधिकारी गणपत पवार, कृषी विस्तार अधिकारी तेजस्विनी वर्तक, विस्तार अधिकारी पंचायत समिती प्रसाद म्हात्रे यांनी भेट देऊन ग्रामपंचायतीमध्ये केलेल्या ओला सुका कचरा विलगीकरण, गावात सीसीटीव्ही कॅमेरा, मुख्य नाक्यावर पाण्याची टाकी, बेसीन, घंटागाडी, गावात पाणी पिण्यासाठी सायरन असणार्‍या सोईसुविधा यांची पाहणी केली. त्यांच्या समवेत तळा पंचायत समिती विस्तार अधिकारी व ग्रामपंचायतच्या प्रशासक पुष्पा नेरकर, वाशी हवेली ग्रामसेवक अश्‍विनी धुत्रे, सरपंच जगन्नाथ तांडेल, माजी सरपंच ज्ञानदेव तांडेल हे उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमासाठी वाशी हवेली कोळीवाडा, कुणबी वाडी आणि बौद्धवाडी येथील गांव अध्यक्ष महिला अध्यक्ष व ग्रामस्थ यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सरपंच जगन्नाथ तांडेल यांनी वाशी हवेली येथील माजी उपसरपंच सदस्य व ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. वाशी हवेली गाव सरपंच व ग्रामस्थ यांचे प्रयत्नांनी नेहमी विविध योजना व उपक्रम राबवून अग्रेसर राहत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

Exit mobile version