। अलिबाग । वार्ताहर ।
लायन्स क्लब अलिबागतर्फे गांधी जयंतीचे औचित्य साधून आक्टोबर सेवा सप्ताहाच्या निमित्ताने सागाव आदिवासीवाडीतील गरीब आणि गरजू मुलांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी साधारण पन्नासहून अधिक मुलांना उत्तम प्रतिचे टीशर्ट आणि पँटचे वाटप लायन पदाधिकार्यांकडून करण्यात आले. यावेळी मुलांच्या चेहर्यावरील समाधानाचे हसू हीच लायन्स अलिबागच्या माध्यमातून करीत असलेल्या सेवेची पोचपावती असल्याचे उपस्थितांनी बोलून दाखवले. यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये अलिबाग लायन्सच्या अध्यक्ष अॅड. गौरी म्हात्रे, महेश कवळे, अंकिता म्हात्रे, गिरीश म्हात्रे, नितीन शेडगे, रमेश धनावडे, अभिजित आमले, प्रकाश देशमुख, परेश भतेजा, संजय मोरणकर, मनोज ढगे, अतुल कुलकर्णी, कल्पेश थळे यांसह लहान मुले, मुली आणि त्यांचे पालक उपस्थित होते.
आदिवासी मुलांच्या चेहर्यावर हसू
