। अलिबाग । वार्ताहर ।
रा.जि.प.शाळा,वायशेत येथील विद्यार्थ्यांना श्रीबाग लायन्स क्लबतर्फे शुक्रवार (दि.2) शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संगिता म्हात्रे, अॅड.कला पाटील , रमाकांत म्हात्रे, विजय वनगे, बाबासाहेब चौगुले, संजय रावळे, श्रीकांत पाटील, नितीन पाटील, श्रद्धा पाडगे, सौ.डोळे,सौ. भोईर, मनीषा नागे, सौ.भगत, श्री. थळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक संदीप वारगे यांनी सूत्रसंचालन केले. शाळेच्या विद्यार्थीनींनी स्वागत गीत सादर केले. यावेळी कला पाटील, चौगुले, श्रीकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या,पुस्तके,पेन व कलर बॉक्स, खाऊचे वाटप करण्यात आले. अमोल नागावकर यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.