| माणगाव । वार्ताहर ।
माणगाव नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक 6 मधील सैनिक विश्रामगृहाचे सुशोभीकरण करावे तसेच अन्य विविध प्रश्नांबाबत वार्डातील लोकप्रतिनिधी माणगावच्या नगरसेविका हर्षदा सुमित काळे(सोंडकर) यांनी आवाज उठविला आहे. या विविध प्रश्नांबाबत दि.29 नोव्हेंबर 2022 रोजी अलिबाग येथे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांची सुमित काळे तसेच प्रभागातील ज्येेष्ठ नागरिक व माजी सैनिक आप्पा खैरे, माजी सैनिक श्री.शिंदे, माजी सैनिक श्री.घाग यांनी भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांना याबाबतचे निवेदन दिले.शहराच्या मध्यभागी असलेले सैनिक विश्रामगृह दुरुस्ती करून परिसरात स्वच्छता करणे तसेच माजी सैनिक यांनी शासनाकडे वेळोवेळी केलेले पत्रव्यवहार त्यानुसार इतर शासकीय कामाकरिता महिन्यातील एक दिवस शासकीय अधिकारी माणगाव येथे उपस्थित राहणे अशा अनेक प्रकारच्या अनेक माजी सैनिक संघटनेच्या मागण्यांसाठी सुमित काळे व सहकार्यांनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून माणगावमधील हे प्रश्न लवकरच मार्गी लावावे अशी विनंती केली.