| खांब | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील वरसगाव या गावच्या रहिवासी असणार्या स्मिता सतीश सानप आरोग्य खात्यातून (दि.31) रोजी सेवानिवृत्त झाल्या आहेत. जांभुळपाडा येथे आरोग्य सहाय्यिका या पदावरून त्या सेवानिवृत्त झाल्या. त्यानिमित्त निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांचा सन्मान करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी सरपंच सुशील शिंदे, रमेश सानप, डॉ. गणेश गायकवाड, विनायक रूगे, आबा शिंदे, सहदेव कापसे, हरिश्चंद्र खरिवले, अनिल खरिवले, नितिन खरिवले, रमेश खरिवले, समीर खरिवले, रमेश शिर्के, नथुराम पाष्टे, चंद्रकांत गुलगुले, परशुराम दळवी, पो.पाटील चंद्रकांत सानप, एकनाथ बागुल, राजेंद्र सानप, नामदेव सानप,गणेश सानप, दत्ताराम बक्कम, दिलीप सानप आदी प्रमुख मान्यवरांसह त्यांचा मित्र परिवार तसेच आप्तस्वकीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.