चालत्या एसटीतून धूर

चालकाच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली

। अलिबाग । प्रतिनिधी ।

पेण-आंबेघर एसटी बसममधील गिअर बॉक्समधून अचानक धूर येऊ लागला. ही बाब चालकाच्या लक्षात आल्यावर त्याने सतर्कता दाखवत आग आटोक्यात आणली. सुदैवाने जीवितहानी टळली असून, एसटीदेखील सुस्थितीत रस्त्यावर धावत असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

पेण एसटी बस आगारातून सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आंबेघरकडे एसटी बस निघाली. रस्त्यावरून धावत असताना अचानक गिअर बॉक्समधून धूर येऊ लागला. चालकाने सतर्कता दाखवत गाडी थांबवली. धूर येत असलेल्या ठिकाणी अग्निशमन यंत्राद्वारे धूर आटोक्यात आणला. गिअर बॉक्सला कोणते तरी घर्षण झाल्याने धूर आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Exit mobile version