अमेठीमधून स्मृती इराणी पराभूत

| अमेठी | वृत्तसंस्था |

लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. अमेठीमध्ये काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांचा विजय झाला आहे. तर भाजपच्या स्मृती इराणी यांचा पराभव झाला आहे.

काँग्रेसचे किशोरीलाल शर्मा 1.26 लाख मतांनी आघाडीवर, उत्तर प्रदेशातील काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी लोकसभा मतदारसंघात मोठी उलथापालथ झाली आहे. गेल्या निवडणुकीत राहुल गांधी यांचा पराभव करुन विजयी झालेल्या स्मृती इराणी यांना मोठा धक्का बसला आहे. गांधी घराण्याचे निकटवर्तीय काँग्रेस उमेदवार किशोरीलाल शर्मा मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहेत.

मतमोजणीत काँग्रेसच्या किशोरीलाल 1 लाख 26 हजारहून अधिक मतांनी आघाडीवर असल्याचे दिसत आहे. म्हणजेच, आता भाजपच्या स्मृती इराणी यांचे कमबॅक अवघड आहे. यंदा काँग्रेसने किशोरीलाल शर्मा यांच्यावर अमेठीची जबाबदारी टाकली. येथे 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान झाले होते. आता शर्मा यांनी अमेठी काबीज करुन पुन्हा एकदा तिथे काँग्रेसचा झेंडा फडकावला आहे.

Exit mobile version