| बंगळुरू | वृत्तसंस्था |
कर्नाटक पोलिसांनी तिरुपती येथून तस्करी केलेले एक कोटीचे रक्तचंदन जप्त केले. रक्तचंदनाच्या तस्करीवर मोठी कारवाई करताना कर्नाटक पोलिसांनी बंगळूर ग्रामीणमध्ये एक कोटी किमतीचे 180 ओंडके जप्त केले. हा अवैध माल जंगलात लपवण्यात आला होता. तो आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे लपवल्याचे सांगण्यात येत आहे.
कर्नाटकातील होस्कोटे तालुक्यातील तिरुमलशेट्टीहळ्ळी पोलिसांनी कट्टीगेनहळ्ळी गावातून बेकायदेशीरपणे साठवलेले रक्तचंदनाचे 180 ओंडके जप्त केले आहेत. तस्करांनी निलगिरी जंगलात रक्तचंदन लपवले होते. जप्त केलेल्या लाकडांची किमत एक कोटी असल्याचा अंदाज आहे. रक्तचंदनाची तस्करी आंध्र प्रदेशातील तिरुपती येथून केली होती. जिथे चोरीचा गुन्हा दाखल केला होता. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत हा साठा जप्त केला. जप्त केलेले रक्तचंदन आंध्र प्रदेश पोलिसांकडे सोपवले आहे. बंगळूर ग्रामीण पोलिस अधीक्षक म्हणाले, ‘आंध्रमधील गुन्हेगारांना अटक केली आणि त्यांनी येथील स्थान उघड केले. तिरुपती रेड सँडर्स अँटि-स्मगलिंग टास्क फोर्सने एका मोठ्या आंतरराज्यीय रक्तचंदन तस्करी रॅकेट उद्ध्वस्त केले.







