| सुधागड -पाली | वार्ताहर |
सुधागड सह जिल्ह्यातील प्रसिद्ध सर्पमित्र दत्तात्रेय सावंत यांनी त्यांची मुलगी स्नेहल हिच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील सर्पमित्रांनी सर्प पकडण्याकरीता यु आकारातील काठी भेट दिली आहे. हा कार्यक्रम पाली वनविभागाच्या कार्यालयात नुकताच संपन्न झाला.
या भेटीमुळे तालुक्यातील सर्पमित्रांना सापाचा जीव वाचविणे सोपे जाणार आहे. सुरक्षित रित्या साप पकडून तो नैसर्गिक अधिवासात सोडता येईल. या विधायक उपक्रमाचे वनविभाग व सर्पमित्रांनी कौतुक केले. या वेळी वनपाल वसंत जाधव, वनरक्षक मारुती मुंडे, योगेश साजेकर, योगिता पुंडे, मनीषा मोरे, पांडुरंग पवार आदी वनविभागाचे कर्मचारी, दत्तात्रेय सावंत, स्नेहल सवांत आणि तालुक्यातील सर्पमित्र उपस्थित होते.
सापांना वाचविण्यासाठी सर्पमित्राची अनोखी भेट
