। पोलादपूर । प्रतिनिधी ।
महाड विधानसभा मतदार संघातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तसेच महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार स्नेहल जगताप-कामत यांनी ’जीत हो या हार हो, मुकाबला टक्करका होना चाहिये. अब मुकाबला टक्करका होगा. और जीतभी हमारी होगी. अशा शब्दांत महाड विधानसभा मतदार संघातील शिवसेना आ. भरत गोगावले यांच्याविरोधात यल्गार पुकारला आहे.
पोलादपूर तालुक्यातील माटवण, सवाद, धारवली, कालवली, आंग्रेकोंड, वावे, कुळेवाडी तसेच पोलादपूर तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच्या धामणदिवी गावांमध्ये गावभेटीचा दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल माणिक जगताप यांचा प्रचार दौरा तरुण, महिला तसेच जेष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वी पार पडला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख पद्माकर मोरे, तालुकाप्रमुख अनिल मालुसरे, अजय सलागरे, सरपंच चैतन्य म्हामुणकर, अकबरभाई वलीले, नगरसेवक दिलीप भागवत, कृष्णा कदम, माजी राजिप सदस्य अनिल नलावडे, भरत चोरगे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कृष्णा करंजे, शेकाप विधानसभा चिटणीस एकनाथ गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती वैभव चांदे, विलास सकपाळ, सागर शिंदे, तैय्यबभाई, समीर चिपळूणकर, यासिन करबेलकर, नासिर माटवणकर, मुज्जमील तांबे यांच्यासह तरुण शेकाप कार्यकर्ते व शिवसैनिक तसेच महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.