सायकलिंगमध्ये स्नेहल माळी प्रथम

महाराष्ट्र सायकलिंग संघामध्ये स्थान पक्के

| रसायनी | वार्ताहर |

विजापूर-कर्नाटक येथे होणार्‍या राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेकरिता बारामती येथे महाराष्ट्र राज्य सायकलिंग असोसिएशनतर्फे मुलामुलींची निवड स्पर्धा घेण्यात आली. त्यात 18 वर्षांखालील वयोगटात नवी मुंबई खारघरची स्नेहल शत्रुघ्न माळी हिने प्रथम क्रमांक पटकावून महाराष्ट्राच्या संघात आपले स्थान पक्के केले आहे.

स्नेहलला प्रताप जाधव उपाध्यक्ष सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व श्री. साठे महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन व फेनिक्स सायकलिंग क्लब, पुण्याचे दर्शन बारगुजे यांचे मार्गदर्शन लाभले. स्नेहल ही रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांची सुकन्या आहे.

दरम्यान, स्नेहल शत्रुघ्न माळी हिने याअगोदर रांची झारखंड येथे झालेल्या 52 व्या राष्ट्रीय ट्रक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले. तर, सर्व राज्य विजेते, भारतीय रेल्वे, आशियाई खेलो इंडिया खेलोमध्ये रौप्यपदक पटकावले आहे. स्नेहलचे राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत तिसरे पदक असून, कुरुक्षेत्र येथे सुवर्णपदक पटकाविले आहे. तिच्या यशाबद्दल सर्व थरांतून स्नेहलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version