। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीचे विद्यमान नायब राज्यपाल व्ही.के.सक्सेना यांच्या अवामनप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मानहानीच्या प्रकरणात त्यांना दक्षिण पूर्व दिल्लीतून अटक करण्यात आली असून शुक्रवारी (दि. 25) मेधा पाटकर यांना साकेत न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
मेधा पाटकर या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या नर्मदा बचाओ आंदोलनाच्या संस्थापक म्हणूनही ओळखल्या जातात. 2000 साली त्यांच्याविरोधात दिल्लीत मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी दिल्ली न्यायालयात सुनावणी झाली असता त्यावर न्यायालयाने मेधा पाटकर यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. यानुसार शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी मेधा पाटकर यांना अटक केली आहे.