| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ गावामध्ये मुलीच्या प्रकरणावरून एक तरुण नंग्या तलवारी घेऊन दहशत माजवण्यासाठी भर वस्तीतून धावत होता. या घटनेबाबत नेरळ पोलिसांनी तलवार घेऊन धावणाऱ्या तरुणाला अटक केली आहे.
नेरळ पोलीस ठाणे हद्दीत बुधवारी (दि.23) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मौजे नेरळ गावच्या हद्दीत हेटकर आळी येथून कल्याण फाटा या दरम्यान मोहाची वाडी येथील तरुण तलवार घेऊन पाठलाग करीत होता. तरुणीच्या प्रकरणावरून हा प्रकार घडला असून, त्यामुळे नेरळ गावात दहशत माजवण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे नेरळ पोलीस ठाणे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आणि रायगड जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेश लागू असतांना असा प्रकार करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. काळया रंगाची लोखंडी धारदार तलवार जवळ बाळगतांना सापडला आहे. या प्रकाराबद्दल नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदा तलवार घेऊन धावणाऱ्या तरुणाला गुरुवारी (दि.24) रोजी अटक केली आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस नाईक साळुंके हे करीत आहेत.