उरणमध्ये खेळ आणि खेळाडूंचा सामाजिक जागर

| वार्ताहर । उरण ।

उरणमध्ये द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशने शनिवारी जे.एन.पी.टी कामगार वसाहतीच्या कर्मचारी क्लबमध्ये ‘चला घडवू खेळांचे उरण’ या सामाजिक जागरणाचे आयोजन करण्यात आले आहे. उरणमधील तरुण खेळासाठी उत्साहाने सहभागी व्हावे या उद्देशाने पुढील महिनाभर हे जनजागरण करण्यात येणार आहे.

यावेळी द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत, कामगार नेते भूषण पाटील, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, गोपाळ पाटील, राजा पडते, एल.बी.पाटील आदींनी मार्गदर्शन केले. द्रोणागिरी स्पोर्ट्सच्या वतीने 22 वर्षापासून विविध प्रकारच्या जिल्हास्तरीय स्पर्धा भरविण्यात येत आहेत. त्यांच्या माध्यमातून तालुक्यातील तरुण खेळासाठी उत्साहाने सहभागी व्हावे या उद्देशाने पुढील महिनाभर हे जनजागरण करण्यात येणार आहे. यावेळी उरण सारख्या विकसित होणार्‍या शहरात खेळाचे मैदान नसल्याने येथील खेळाडूंना सरावासाठी नवी मुंबई किंवा मुंबईत जावे लागत आहे. मात्र तरीही तालुक्यातील अनेक खेळाडूंनी खेळातील आपले कौशल्य सिध्द केले आहे. त्यासाठी जागर भरविण्यात आला आहे.

Exit mobile version