प्रीतम म्हात्रे यांच्याकडून अन्नसेवा

| पनवेल | वार्ताहर |

दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे पटेल मोहल्ला आणि कच्छी मोहल्ला येथील रहिवासीयांना सुरक्षिततेच्या दृष्टीने पनवेल मनपा शाळा क्र. एक 4, कोळेश्वर विद्यामंदिर आणि पनवेल मनपा उर्दू शाळा क्र.10 येथे यांना हलविण्यात आले. त्या ठिकाणी माजी विरोधी पक्षेनेते प्रीतम म्हात्रे यानी भेट देऊन त्यांची विचारपूस करून त्यांच्यासाठी नाष्टा आणि जेवणाच्या माध्यमातून अन्नसेवेची व्यवस्था केली. तसेच पाऊस थांबल्यानंतर त्यांना आवश्यक त्या सहकार्याची माहिती घेतली. पनवेल महानगरपालिका, शेतकरी कामगार पक्ष आणि जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे वतीने आम्ही सर्व पनवेलकर म्हणून त्यांच्यासोबत एक कुटुंब म्हणून आहोत असे त्यानी सांगितले.

Exit mobile version