अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या मार्फत 5 डिसेंबर 2021 जागतिक मृदा दिना निमित्त जमीन आरोग्य बाबत मार्गदर्शन मृदा परीक्षण, शेतकरी प्रशिक्षण आणि भातपड कार्यक्रम हा कार्यक्रम ग्रुप ग्रामपंचायत वाडगांव यांच्या मार्फत वाडगांव येथे संपन्न झाला.
यावेळी कृषी उपविभागीय अधिकारी श्री वानखेडे, जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी श्रीमती सावंत, वाडगाव ग्रामपंचायत सरपंच सरिता भगत, कृषी विज्ञान केंद्र रोहा येथील शास्त्रज्ञ सचिन कार्लेकर, आरसिफ चे जिल्हा मार्केटिंग अधिकारी अमर घडवे, नागाव मंडळ कृषी अधिकारी पाटील, माजी सरपंच जयेंद्र भगत, ग्रामपंचायत सदस्य शुभांगी भगत, प्रमिला कुळे, माजी पोलीस पाटील नथुराम पाटील, राघी पवार, बाळू थळे, कृषी पर्यवेक्षक एक एस सुर्यवंशी, कृषी सहायक एन एम बनबरे आदींसह ग्रामस्थ, ग्रामपंचायत व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.