मुरूडच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी
| कोर्लई | वार्ताहर |
पनवेल येथे नुकत्याच झालेल्या 4थ्या सोके कप कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत मुरूडच्या विद्यार्थ्यांनी 4 सुवर्ण, 2 रौप्य व 2 कांस्य पदके पटकावत दमदार कामगिरी केल्याने सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. ही स्पर्धा गोशिन रियू कराटे-डो असोसिएशन इंडिया व शिहन-राजू कोहली यांच्यातर्फे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी रायगड, मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यातून 120 हूनअधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. यामध्ये रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातून विद्यार्थ्यांनी 4 सुवर्ण, 2 रौप्य व 2 कास्य पदके अशी एकूण 8 पदके पटकावत दमदार कामगिरी केली. त्याचप्रमाणे आपल्या नावे संघ चषक (टीम ट्रॉफी) रायगड संघाने आपल्या नावे केले.
या स्पर्धेमध्ये उत्कृष्टरित्या कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांत शिवम अच्युत चव्हाण 2 सुवर्ण पदक, शुभंकर सचिन राजे सुवर्ण व रौप्य पदक, देवांशू सचिन सोनावणे सुवर्ण व कास्य पदक, वरुण वि. कचरेकर रौप्य व कास्य पदक यांचा समावेश असून ओकिनावा रियू कियू शीतो रियू कराटे डो क्योकाई इंडिया या संस्थेच्या अंतर्गत विद्यार्थी सातत्याने सराव करीत आहेत, तर या सर्व विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक शिहान डॉ. आदित्य अनिल , सेंसाय.सनी रा.खेडेकर, सेंसाय शिवम धि. सिंह या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे प्रगती घुरुप, निषात विरकुड, अमृता पाटील, जैनेंद्र सिंह आदी पालक वर्गाने तसेच, शीतो रियु कमिटी महाराष्ट्रने अभिनंदन करुन पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.