कोर्लईतील 19 बंगले घोटाळा प्रकरणी सोमय्यांची पुन्हा तक्रार दाखल

| रेवदंडा | प्रतिनिधी |

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या मालकीच्या कोर्लईतील कथित 19 बंगले प्रकरणाची पुन्हा चौकशी केली जावी, यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रविवारी रेवदंडा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. नववर्षाच्या प्रारंभी शुभेच्छा देतानाच सोमय्या यांनी आपण ठाकरे यांच्या बंगला घोटाळ्याचा पाठपुरावा करणार असल्याचे सूचक ट्वीट केले होते. त्यानुसार रविवारी त्यांनी रेवदंडा येथे येऊन पोलिसात तक्रार दाखल केली. रेकॉर्डवरील कागदपत्रे गायब केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या विषयी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी रिपोर्ट मागविला असून पुढील आठवडयात हा रिपोर्ट त्यांचेकडे पोहचेल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आश्‍वासन दिले आहे, पोलिसांना सात दिवसात यांचा तपास करून एफआरआय दाखल करावा लागेल. असेही त्यांनी पुढे म्हटले.

सोमय्या हे रेवदंडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास येणार असल्याने मोठा पोलिस बदोबस्त सकाळी दहा वाजल्यापासून तैनात होता. दुपारी बाराचे सुमारास भाजप नेते किरीट सौमय्या यांचे आगमन झाले, यावेळी त्यांचे समवेत अ‍ॅड. महेश मोहिते, परशुराम म्हात्रे, अशोक वारंगे, अ‍ॅड अंकित बंगेरा, संकेत जोशी, मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर आदीसह भाजप महिला पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

Exit mobile version