कुस्तीपटू सोनम मलिकला धोबीपछाड

मंगोलियन कुस्तीपटूने केले पराभूत
| टोक्यो | वृत्तसंस्था |
टोकियो ऑलिम्पिकमध्ये युवा कुस्तीपटू सोनम मलिकला फ्री स्टाइल (62 किग्रॅ) वजनी गटात पराभव स्वीकारावा लागला. तिला मंगोलियाच्या बोलोरतुया खुरेलखूनकडून धोबीपछाड मिळाला. सोनम सुरुवातीला आघाडीवर होती. परंतु, बोलोरतुया खुरेलखूने सामन्यात पुनरागमन केलं आणि स्कोअर 2-2 असा बरोबर केला. त्यानंतर बोलोरतुया खुरेलखूनला 2 टेक्निकल पॉइंट मिळाले. याच आधारावर तिचा विजय झाला. मात्र, सोनम मलिक अजूनही पदकाच्या शर्यतीत आहे. जर मंगोलियाची खुरेलखू अंतिम फेरीत पोहोचली, तर सोनम मलिकला रेपेचेज फेरी खेळण्याची संधी मिळेल, जेणेकरून ती कांस्यपदक जिंकेल.

Exit mobile version