सोनी कापसे यांचे निधन

। गोवे-कोलाड । प्रतिनिधी ।

रोहा तालुक्यातील मुठवली येथील रहिवाशी सोनी शांताराम कापसे यांचे बुधवारी (दि.13) निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 92 वर्षाचे होते. त्या मुठवली येथील रहिवाशी असून गोवे येथील त्यांच्या मुलीकडे राहत होत्या. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांचे नातेवाईक, सामाजिक, राजकीय, व शैक्षणिक तसेच समस्त मुठवली ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा, सुन, मुलगी, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी शुक्रवारी (दि.22) तर उत्तरकार्य विधी शनिवारी (दि.23) त्यांच्या मुठवली येथील निवास्थानी होणार आहेत.

Exit mobile version