। चिपळूण । प्रतिनिधी ।
चिपळूण शहरातील मिसबा अपार्टमेंट येथे राहणारे ग्रामसेवक मंगेश पांचाळ यांचे दोन सुपुत्र ऋषिकेश व कौस्तुभ पांचाळ या दोघांनी महापुरामध्ये सुमारे 10 फूट पुराच्या पाण्यातून जीवाची पर्वा न करता वाहून जाणार्या सुधाकर सकपाळ आणि सुधीर सकपाळ या दोन बंधूना सुखरूप बाहेर काढले. तसेच अचानक पुराच्या पाण्याची पातळी वाढू लागल्यावर अनामिका हरधारे यांच्या कुटुंबातील तीन व्यक्ती घरामध्ये अडकून होत्या. त्यांना खिडकीच्या लोखंडी ग्रील तोडून सुखरूप बाहेर काढले. ही कामगिरी करत असताना दोघे बंधू घरापासून 24 तास दूर राहून अविनाश हरधारे यांच्या घरी सुखरुप होते. महापुराच्या संकटसमयी त्यांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल कुटुंबीय व मार्कंडी परिसरातील ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक होत आहे.