। मुंबई । वृत्तसंस्था ।
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाला झळ बसली आहे.या युद्धामुळे युक्रेनमध्ये अनेक भारतीय अडकले आहेत. अशा परिस्थितीत, अडकलेल्या भारतीयांना तसेत भारतीय विद्यार्थ्यांना तेथुन बाहेर काढणे, हे खुप मोठे आव्हान आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी अभिनेता सोनू सूद पुन्हा मदतीला धावून आला आहे. याविषयी त्याने ट्वीट करत माहिती दिली.
सोनु सुद यांच्या मदतीने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्यात आले. याबद्दल सोनू सुद यांनी ट्विटमध्ये म्हटले,
युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांसाठी हा कठीण काळ आहे. कदाचित माझे हे आतापर्यंतचे सर्वात कठीण काम आहे. सुदैवाने, आम्ही अनेक विद्यार्थ्यांना सीमा ओलांडून सुरक्षित ठिकाणी जाण्यास मदत करू शकलो. आपण प्रयत्न करत राहू.
सोनू सूदने आपल्या ट्वीटमध्ये भारत सरकार, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि भारतीय दूतावास यांनी दिलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभारही मानले. भारत सरकारने यापूर्वी भारत सरकारनी अनेक विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढलेत.