द.आफ्रिकेचा कसोटीसाठी संघ जाहीर

नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
दक्षिण आफ्रिकेने भारताविरूद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी 21 सदस्यीय तगडा संघ जाहीर केला आहे. 26 डिसेंबर ते 15 जानवेरी 2022 या कालावधीत ही कसोटी मालिका पार पडणार आहे. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील या मालिकेत आफ्रिकन संघ टीम इंडियाला कडवे आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आहे. सेंच्युरियन, जोहान्सबर्ग व केप टाऊन येथे हे कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.
यावर्षी जून महिन्यात वेस्ट इंडिज दौर्‍यावर गेलेल्या संघातील अनेक सदस्यांना टीम इंडियाविरूद्धच्या मालिकेसाठी कायम राखले आहे. त्यात तीन नव्या चेहर्‍यांचा समावेश केला आहे. कागिसो रबाडा, क्विंटन डी कॉक आणि अ‍ॅनचि नॉर्ट्जे यांच्यावर मदार असेल. तर गोलंदाज ड्यून ऑलिव्हर याचे दोन वर्षांनी संघात पुनरागमन होत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या स्थानिक स्पर्धांमध्ये केलेल्या दमदार कामगिरीमुळे त्याची पुन्हा एन्ट्री होत आहे.
फेब्रुवारी 2019 मध्ये त्याने श्रीलंकेविरूद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. 29 वर्षीय ऑलिव्हरने 8 डावांत 11.14 च्या सरासरीने 28 विकेट्स घेतल्या आहेत. ग्लेटन स्टुर्मन व प्रेनेलान सुब्रायेन यांनाही संधी मिळाली आहे. तर सिसांडा मगाला व रियान रिकेल्टन यांना कसोटी पदार्पणाची संधी मिळाली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघ
डिल एल्गर, टेम्बा बवुमा, क्विंट डी कॉक, कागिसो रबाडा, सारेल एर्वी, बेयूरन हेंड्रीक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी एनगिडी, एडन मार्कराम, वियान मुल्डर, अ‍ॅनरिच नॉर्ट्जे, किगन पीटरसन, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, कायले वेरेयन, मार्का जान्सेन, ग्लेंटन स्टुर्मन, प्रेनेलान सुब्रायेन, सिसांडा मगाला, रियान रिकेल्टन, ड्युन ऑलिव्हर.

Exit mobile version