स्पेनची विजयी सुरवात

| पॅरीस | वृत्तसंस्था |

स्पेन आणि अर्जेंटिना यांनी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दुसऱ्या फळीतील खेळाडू उतरवले आहेत. स्पेनच्या संघाने ‌‘क’ गटात विजयी सुरूवात केली, तर अर्जेंटिनाला ‌‘ब’ गटात बरोबरीवर समाधान मानावे लागले.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील फुटबॉल सामन्यांना गुरूवार पासून सुरूवात झाली. ‌‘ब’ गटातील सामन्यात मोरोक्कोने वर्चस्व राखताना अर्जेंटिनाला जखडून ठेवले होते. रहिम सौफिन याने 45+2 मिनिटाला मोरोक्कोला पहिल्या हाफमध्ये आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 49व्या मिनिटाला पेनल्टीवर आणखी एक गोल करून मोरोक्कोने अर्जेंटिनाला बॅकफूटवर फेकले. 68 व्या मिनिटाला सिमॉन गियूलिनोच्या गोलने अर्जेंटिनाला धीर दिला. तरीही त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करावा लागला. 90+16 मिनिटाला मेडिना ख्रिस्टियनच्या गोलने अर्जेंटिनाचा पराभव टाळला. मोरोक्कोविरुद्धचा हा सामना 2-2 असा बरोबरीत सुटला.

‌‘क’ गटातील सामन्यात स्पेनने 2-1 अशा फरकाने उझबेकिस्तानचा पराभव केला. मार्क पुबिलने 29व्या मिनिटाला स्पेनला पहिला गोल करून दिला. त्यानंतर 45+3 मिनिटाला पेनल्टीवर एल्डर शोमुरोडोव्हने गोल करून उझबेकिस्तानला 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली. दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांनी आघाडीसाठी जोर लावला, परंतु 62व्या मिनिटाला सर्गिओ गोमेझच्या गोलने स्पेनला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर स्पेनने ही आघाडी कायम राखताना विजय पक्का केला.

Exit mobile version