बेकायदा पार्किंगविरोधात विशेष मोहीम

| मुंबई | प्रतिनिधी |

दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबईतही पोलिसांकडून ठिकठिकाणी बंदोबस्त वाढवला असून, शहरातील विविध ठिकाणी असलेल्या अनधिकृत पार्किंगची तपासणी सुरू केली आहे. मुंबईत साडेतीन हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. सर्वाधिक 320 वाहनांवर कारवाई आझाद मैदान परिसर वाहतूक पोलिसांनी केली. मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा, पदपथावर, चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये कुठेही अनधिकृत पार्किंग केली जाते. त्यामुळे वाहतूक कोंडीसह पदपथावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. याच बेकायदा पार्किंगवरील कारवाईतून संभाव्य धोका टाळण्यासाठी वाहतूक पोलीस उपाययोजना करीत आहेत.

Exit mobile version