। नेरळ । प्रतिनिधी ।
शेतकर्याला शेतीमधील बदलाच्या निमित्ताने महत्वाची भूमिका घेणारे शास्त्रज्ञ डॉ. पंजाबरावदेशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त कृषी संजीवनी पंधरवडा साजरा केला जात आहे. या निमित्ताने 17 जून ते एक जुलै या कालावधीत शेतकर्यांच्या हिताचे अनेक उपक्रम राबविले जात आहेत.
यामध्ये बीज प्रक्रिया जनजागृती दिन, पी एम किसान उत्सव दिवस, जमीन सुपीकता बाबत जनजागृती, गुणवत्तापूर्वक निष्ठांची ओळख, पीक विमा जनजागृती दिवस, फळबाग लागवड, भात वर इतर महत्त्वाच्या पिकांच्या लागवड तंत्रज्ञाबाबत जनजागृती, महिला शेतकरी सन्मान दिवस, विविध योजनांची प्रचार व प्रसिद्धी, शेतकरी मासिक वाचन दिन व 1 जुलै रोजी कृषी दिन साजरा करण्यात येणार आहे. कर्जत तालुक्यात गावनिहाय कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेले असून विषयनिहाय शेतकरी प्रशिक्षण वर्ग घेण्यात येत आहे.







