वरसोली येथे विशेष ग्रामसभा

। अलिबाग । प्रतिनिधी ।
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य आदेशानुसार मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2023 अंतर्गत गुरुवारी (दि.10) अलिबाग तालुक्यातील वरसोली ग्रामपंचायत येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा संपन्न झाली.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.कल्याणकर यांनी उपस्थित मतदारांना दि.9 नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती दिली. वरसोली ग्रामपंचातीमधील मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड जोडणी किती मतदारांची झाली, याचा त्यांनी आढावा घेतला. तसेच वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या युवकांनी मतदार म्हणून नोंदणी करुन मतदान प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होणे. तसेच मतदारयादीचे शुद्धीकरण करणे, या दुहेरी उद्देशाने अधिकाधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सूचित केले. या ग्रामसभेच्या निमित्ताने दि.9 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदारयादीचे वाचनही करण्यात आले.

यावेळी सरपंच प्रमिला भाटकर, उपसरपंच मिलिंद कवळे, सदस्य सुरेश घरत, सुजय घरत, नमिता माळवी, सजवणी कवळे, प्रियका गुंजाळ, नम्रता वर्तक, पूजा खोत, अनुराधा राणे, साधना राणे, दिलीप बना, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे, अलिबाग प्रांताधिकारी प्रशांत ढगे, तहसिलदार मीनल दळवी, ग्रामविकास अधिकारी अनिल चवरकर, तलाठी दिलीप सानप, जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयातील कर्मचारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे उपस्थित होते.

Exit mobile version