बोर्ड परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शन

| अलिबाग | प्रतिनिधी |

हाशिवरे हितवर्धक मंडळाच्या महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि वैजाळी इंग्रजी माध्यमिक शाळेतील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शन वर्गाचे आयोजन शनिवारी (दि.22) करण्यात आले होते. यावेळी डोंबिवली येथील तज्ज्ञ मार्गदर्शकांचे उपयुक्त असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. हे आयोजन हाशिवरे हितवर्धक मंडळाचे सचिव अनिल मोकल यांच्या प्रयत्नातून करण्यात आले. यावेळी माधुरी लोलायकर, अतुल साठे, संजना करंजे, श्रेया पारेख, वैदेही लिमये, राम गवारे यांनी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी हाशिवरे हितवर्धक मंडळाचे सचिव अनिल मोकल, सल्लागार सुबोध मोकल, प्राचार्य बी.डी. गायकवाड, पर्यवेक्षक प्रबळकर, अर्चना ठाकूर, म्हात्रे, भोईर, डॉ. वघाळे, मोरे, माने, कोळी, चांदनी ठोंबर, प्रतिक म्हात्रे आदी शिक्षक व 200 विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version