| रसायनी । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील उदयोन्मुख महिला आणि युवक क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी रायगड प्रिमियर लिग आणि रोटरी क्लब ऑफ यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. युवा खेळाडूंनी जिल्ह्याचे नांव संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर पोहचवले आहे. जिल्ह्यातील अशा उदयोन्मुख आणि नामवंत क्रिकेट खेळाडूंच्या सातत्य पूर्ण योगदानाची दखल घेऊन रायगड प्रिमियर लिग आणि रोटरी क्लब ऑफ खोपोली यांनी पाठीवर शाबासकीची थाप म्हणून प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या युवा खेळाडू स्वरा खेडेकर, निशिता विठलानी, उर्वशी साळुंखे, वैभवी कुलकर्णी, श्रुती अडीत, अस्मिता गोवारी, प्रांजल चिलवंत, सुखदा चव्हाण, ज्ञानेश्वरी येरुणकर, गार्गी साळुंखे, समृध्दी कांबळे, सुजल राजपुरोहित, एकता शर्मा, ईश्वरी खत्री, कृतिका मुंढे, समिधा तांडेल तनिशा शर्मा, रोशनी पारधी, अक्षया यादव, खुशी भारती, आर्या गडदे, वंशीका मोहीते, जान्हवी चौगुले यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील हॉकी खेळाडू संदीप पाटील, अर्चना पाटिल, संतोष जंगम, सुरेंद जोशी, रविंद्र घोडके, राजेश पाटील, जयंत नाईक, कौस्तुभ जोशी, सर्वश्री जोशी, प्रितम पाटील, सुरेंद्र भातिकरे, महेंद्र भातिकरे, उमाशंकर सरकार, शंकर दळवी, ऋषिकेश कर्णुक, चंद्रशेखर सावंत, अनिल जैन, संदेश गुंजाळ, रोहीत कार्ले खेळाडुंचे मान्यवर पालक, क्रिकेट क्षेत्रातील जाणकार ऊपस्थित होते.