। खांब । वार्ताहर ।
जुलै महिन्यात आलेल्या पुरामध्ये रोहा तालुक्यातील धानकान्हे येथील पुराच्या पाण्यात अडकलेल्या दहा जणांना सुखरूपपणे वाचविणार्या ‘वाइडर वेस्ट अडवेन्चर’ टिमच्या कोलाड येथील धाडसी तरुणांचा धानकान्हे येथे विशेष सन्मान करण्यात आला आहे.
नदी किनारी असलेल्या एका फार्म हाऊसवर पुराच्या पाण्यात दहाजण अडकले होते. याबाबत माहिती मिळताच वाइडर वेस्ट अडवेन्चर टिमचे हरिश सानप, जयवंत बाकाडे, योगेंद्र राजिवले, आदित्य घायले, विवेक ठाकूर, अरुण काळोखे, सिद्धू सानप यांनी अवघड प्रसंगात दमदार कामगिरी करत सार्यांची यशस्वीपणे सुटका केली होती. त्यांच्या या मदतकार्याचे तसेच धाडसाचे कौतुक करावे या उद्देशाने धानकान्हे ग्रामस्थ व तरूण मंडळाच्यावतीने या टिमचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी सरपंच अर्जुन कचरे, पांडुरंग गोसावी, सुजित कचरे, सखाराम कचरे, धोंडू कचरे, दिपक गोसावी, दिनेश भादावकर, मधुकर जंगम, विश्वास राऊत, सुदाम जाधव, सचिन जाधव, प्रज्योत जाधव, विनायक गोसावी, उमेश कचरे, ज्ञानेश्वर जाधव, निखिल हळदे आदी उपस्थित होते.