। पुणे । प्रतिनिधी ।
स्वातंत्र्यदिनानिमित्त पुण्यातील टॅलेंट कट्टा (अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ संलग्न) संस्थेतर्फे महाराष्ट्रातील स्तंभलेखक श्याम ठाणेदार यांना सह्याद्रीरत्न पुरस्कार देण्यात आला. सह्याद्रीरत्न हा महाराष्ट्रातील मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. 18 ऑगस्ट रोजी पुण्यातील पत्रकार भवन येथे हा दिमाखदार सोहळा पार पडला. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पदक असे होते.
श्याम ठाणेदार हे महाराष्ट्रातले प्रसिद्ध स्तंभ लेखक असून महाराष्ट्रातील विविध वर्तमानपत्रात ते नियमितपणे स्तंभ लेखन करतात. महाराष्ट्रभर त्यांचा वाचक वर्ग आहे. त्यांचे स्तंभ लेखनातील योगदान विचारात घेऊनच त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. स्तंभ लेखनातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सह्याद्रीरत्न पुरस्कार मिळाल्याने श्याम ठाणेदार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी माजी आ. लक्ष्मण सावंत, उद्योजक नितीन धवणे पाटील, सिने अभिनेत्री आर्या घार, डॉ. संतोष सदाशिव मचाले तसेच टॅलेंट कट्टा संस्थापक अध्यक्ष दीपक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.