मोहोपाडा येथे डॉक्टरांसाठी स्पेशल कक्ष

| रसायनी । वार्ताहर ।

मोहोपाडा येथील वंदना मेडिकलचे मालक अरुणशेठ पाटील यांनी मेडिकलच्या बाजूलाच परिसरातील सर्व प्रकारच्या रुग्णांची चांगल्या पद्धतीने सेवा व्हावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर त्यांनी डॉक्टरांसाठी सुसज्ज असा कक्ष उभारला आहे.

त्यात दोन केबिन डॉक्टरांना बसण्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. या ठिकाणी दररोज दुपारी 4 ते रात्री 9 या दरम्यान खोपोली येथील नामवंत जनरल प्रॅक्टिस फिजिशियन डॉ.यश गुप्ता या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. डॉ. गुप्ता हे बी. ए. एम..एस. व एमडी (स्कॉलर) असून त्वचारोग तज्ञ आहेत.

ही जागा उपलब्ध करून दिल्याने डॉ. यश गुप्ता यांनी त्यांचे आभार मानले. डॉ. यश गुप्ता प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की, गोरगरीब सामान्य रुग्णांना चांगल्या पद्धतीने सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल असेही गुप्ता यांनी सांगितले. आजच्या या कार्यक्रमाला डॉ. यश गुप्ता, वंदना मेडिकलचे मालक अरुणशेठ पाटील, वसंतशेठ पाटील, एडवोकेट अनुष्का पाटील, डॉ. जितेंद्र गुप्ता डॉ.शुभांगी गुप्ता, डॉ. महेश गुप्ता, यांचा उद्योजक आशुतोष यादव आदी मंडळी यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version