। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून, मिशन अभ्यागत मोहिमेंतर्गत कोविड-19 प्रतिबंधात्कमक लसीकरण न झालेल्या अभ्यागत तसेच शासकीय अधिकारी, कर्मचार्यांसाठी सोमवार, दि.1 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. सर मोहिमेत सहभागी होवून लसीकरणाचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी आधारकार्ड तथा आधाराकार्डसह संलग्न असणारा संपर्क सोबत बाळगण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष लसीकरण मोहिम

Coronavirus Vaccine bottle Corona Virus COVID-19 Covid vaccines panoramic bottles