| अलिबाग | प्रतिनिधी |
हैदराबाद येथे नुकतीच 26वी सिकाई राष्ट्रीय स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्रासाठी खेळणाऱ्या रायगड व ठाण्याच्या खेळाडूंनी 5 रौप्य व 1 कांस्यपदक पटकावून राष्ट्रीय स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. या स्पर्धेत अठरा वर्षाखालील गटात शिव हिलम व शादाब खान यांनी रौप्यपदक पटकावले. तर, यश शिंदे याने कांस्यपदक पटकावले. अठरा वर्षांवरील वरिष्ठ गटात शुभम नखाते, सौरभ भगत व परमेश केठवत यांनी रौप्यपदक पटकावले. या सर्वांना विजय तांबटकर, प्रियंका गुंजाळ व इम्तियाज खान यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले. तसेच, महाराष्ट्र सिकाई असोसिएशन अध्यक्ष मजर खान व सचिव रवींद्र गायकी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सर्व खेळाडूंचे महाराष्ट्रभरातून खूप कौतुक होत आहे.
महाराष्ट्रासाठी नेत्रदीपक कामगिरी
