। माणगाव । प्रतिनिधी ।
दहावी शाळांत प्रमाणपत्र परीक्षेत गुरुकुल अकॅडमी महाड शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत शाळेची 100% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. दहावीच्या परीक्षेत गुरुकुलचे एकूण 67 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. हे सर्व विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले. यात अनुक्रमे 14 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवून शाळेचे नाव उज्वल केले. त्यामध्ये मयूर नाझरे 96.60% मिळवून प्रथम, रूची भोसले 95.60% मिळवून द्वितीय, ईश्वरी जंगम 95% मिळवून तृतीय. तसेच, साई कारंडे 94.20%, श्रावणी आवटी 93.40%, जिया शहा 93.40%, पार्थ शिंदे 93.20%, आर्यन पाथरे 91.80%, तनिष्का खेडेकर 91.80%, अवनी जोशी 91.60%, आर्यन सावंत 91.40%, अथर्व तटकरे 90.20%, अर्पिता रेवाळे 90.20% व कशिश जागडे 90% या क्रमाने उत्तीर्ण झाले आहेत.
यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष किशोरभाई धारिया, संचालिका सोनाली धारिया, मुख्याध्यापिका वासंती राजपण सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व पालकांनी अभिनंदन करून विध्यार्थ्यांना पुढील शैक्षणीक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्था पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका वासंती राजपण यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांच्या पालकांना निमंत्रित करून त्यांना पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.