मोर्बा मॉडर्न इंग्लिश स्कूलचा नेत्रदीपक निकाल

| माणगाव | प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी शालांत परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. 8) ऑनलाईन जाहीर झाला. या परीक्षेत माणगाव तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या मोर्बा मॉडर्न इंग्लिश स्कूलने आपली उज्वल यशाची परंपरा कायम ठेवीत या शाळेचा दहावी परीक्षेचा एकूण निकाल 100 टक्के लागला असून, सारा राऊत या विद्यानीने 92 टक्के इतके गुण संपादन करून शाळेमध्ये सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे.

या शाळेमधून फर्जिन राऊत या विद्यार्थिनीने 83 टक्के इतके गुण संपादन करून द्वितीय क्रमांक तर मेहवीश बंदरकर या विद्यार्थीनीने 80.80 टक्के इतके गुण संपादन करून तृतीय क्रमांक पटकावत शाळेच्या यशामध्ये मानाचा तुरा रोवला आहे. या शाळेमधून यावर्षी दहावी परीक्षेसाठी एकूण 41 विद्यार्थी बसले होते हे सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये 12 विध्यार्थ्यानी विशेष प्राविण्य संपादन केले असून, प्रथम श्रेणीत 22 विध्यार्थी, द्वितीय श्रेणीत 7 विध्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या शाळेचा दरवर्षी निकाल नेत्रदीपक लागत असल्याने पालकवर्गांमधे तसेच विद्यार्थ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण असून संस्था पदाधिकारी यांनी शिक्षकांचे खास अभिनंदन करून यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सैफुद्दीन धनसे, शौकत रोहेकर, इकबाल धनसे, नजीर धनसे, इकबाल हर्णेकर, मोहन साळी, इम्रान पालेकर, सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदांनी विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version