पीएनपीच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय स्पर्धेत नेत्रदीपक यश

| अलिबाग | प्रतिनिधी |

जिल्हा क्रीडा अधिकारी अलिबाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धा नुकत्याच नेहुली येथे पार पडल्या यामध्ये पीएनपी होली चाईल्ड स्कूल वेश्वी अलिबाग शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले.

17 वर्षा खालील मुलींच्या 62 किलो वजनी गटात नुपूर सतीश बुंदके तृतीय क्रमांक पटकावला, 19 वर्षा खालील मुली 45 किलो वजनी गट श्रावणी मनोज मोरे द्वितीय क्रमांक, 45 किलो वजन गट आरोही अविनाश म्हात्रे तृतीय क्रमांक, 19 वर्षा खालील मुली 48 किलो वजनी गट श्रावणी निकेत भगत प्रथम क्रमांक, 19 वर्षा खालील मुली 52 किलो वजनी गट आयेशा किस्मत खान द्वितीय क्रमांक 19 वर्षा खालील मुले 44 किलो वजनी गट रोहांशू अजिंक्य पाटील प्रथम क्रमांक, 19 वर्षा खालील मुले 62 किलो वजनी गट अंश ओमप्रकाश किल्लेकर प्रथम क्रमांक, 19 वर्षा खालील मुले 70 किलो वजनी गट निसर्ग पाटील द्वितीय क्रमांक, निमिष करवडे तृतीय क्रमांक 19 वर्षा खालील मुले 75 किलो वजनी गट आदिल दापोलकर प्रथम क्रमांक, अंश साखरकर द्वितीय क्रमांक 19 वर्षा खालील मुले 90 किलो वजनी गट तन्मय लखन प्रथम क्रमांक, 19 वर्षा खालील मुले 52 किलो वजनी गट दक्ष रणजीत घोडके द्वितीय क्रमांक, 17 वर्षा खालील मुले 56 किलो वजनी गट हमाजा इरफान मुकादम प्रथम क्रमांक, यशराज भारत माने द्वितीय क्रमांक, 17 वर्षा खालील मुले 52 किलो वजनी गट शौर्य देवेंद्र तांबोळी द्वितीय क्रमांक, 17 वर्षा खालील मुले 80 किलो वजनी गटात आर्यन अजय मयेकर याने द्वितीय क्रमांक पटकावला त्यांची मुंबई विभागीय वुशू क्रीडा स्पर्धेत निवड झाली. या नेत्रदीपक यशाबद्दल पीएनपी संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा नृपाल पाटील, होली चाईल्ड एसएससी बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले व उपमुख्याध्यापिका शर्मिला शेटे, क्रीडा प्रशिक्षक अक्षय डाकी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version